‘भूमी प्रोजेक्ट’तर्फे क्लीन कुंभसाठी भाविकांना सौरदिव्यांचे वाटप
By Admin | Updated: October 4, 2015 00:01 IST2015-10-04T00:01:16+5:302015-10-04T00:01:31+5:30
पर्यावरण रक्षणासाठी कार्यकर्त्यांचा उपक्रम

‘भूमी प्रोजेक्ट’तर्फे क्लीन कुंभसाठी भाविकांना सौरदिव्यांचे वाटप
नाशिक : भूमी प्रोजेक्ट या संस्थेच्या वतीने क्लीन कुंभ योजनेअंतर्गत सुमारे एक हजार भाविकांना सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे संस्थेच्या भ्रमणध्वनीवर मिसकॉल दिल्यानंतर भाविकांना यासंबंधी माहिती देऊन सौरदिवे मोफत देण्यात आले.
सध्या विजेच्या अनिर्बंध वापरामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचे भारनियमन करण्यात येते. विशेषत: ग्रामीण भागात अनेकवेळा विजेअभावी सर्वत्र अंधार असतो. यावर पर्याय म्हणजे सौरऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. यासाठी भूमी प्रोजेक्ट संस्थेच्या वतीने चिन्मय धामणे, मिहिर टाकळे, प्रसाद गरभे, ओंकार उदास, दाणीश कालरा आदि कार्यकर्त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात रामकुंड, तपोवन, साधुग्राम, पंचवटी आदि भागात एक हजार सौरदिव्यांचे वाटप केले.
सध्यादेखील ही मोहीम सुरू आहे. सदर सौरदिवा हा सौरऊर्जेवर पाच तास चार्जिंग झाल्यावर सुमारे ९ तासांपर्यंत प्रकाश देतो. वीज गेल्यास विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करताना हा सौरदिवा उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती धामणे यांनी दिली. (प्रतिनिधी)