मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी सौरकंदील, ताडपत्री वाटप
By Admin | Updated: June 7, 2014 00:34 IST2014-06-07T00:07:11+5:302014-06-07T00:34:05+5:30
येवला : नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० टक्के अनुदानावर मिळालेले सौरकंदील, ताडपत्री, झेरॉक्स मशीन, पाइप या साहित्यांचे वाटप

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी सौरकंदील, ताडपत्री वाटप
येवला : नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० टक्के अनुदानावर मिळालेले सौरकंदील, ताडपत्री, झेरॉक्स मशीन, पाइप या साहित्यांचे वाटप येवला पंचायत समितीने केले.
येवला तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून सौरकंदील (४० नग), ताडपत्री (४३ नग), पाइप (८५ नग), झेरॉक्स मशीन (५ नग) हे साहित्य मिळाले होते.
तालुक्यातील सईबाई झाल्टे (अंगुलगाव), अशोक सदगीर (नायगव्हाण), रामदास राऊतराय (मुखेड) यांना पाइपचे वाटप करण्यात आले.
वाल्मीक सोनवणे (हडप सावरगाव), राधू पानपाटील (शिरसगाव), गोरख पवार (आडगाव रेपाळ) यांना सौरकंदील, तर पोपट खांडेकर (महालखेडा), रामदास सदगीर (नायगव्हाण), गंगाधर काळे (पिंपळगाव लेप) यांना ताडपत्री वाटप झाले. प्रमिला खांडेकर, ठकूबाई उगलमुगले (नगरसूल), बाबूराव कुशारे (कातरणी) या
अपंग लाभार्थींना झेरॉक्स मशीन दिले.
पंचायत समिती सभापती शिवांगी पवार, उपसभापती प्रकाश वाघ, साईनाथ मोरे, संभाजी पवार, पोपट आव्हाड, हरिभाऊ जगताप, अजय जोशी, दिलीप सोनकुदळे, बाळू पवार आदिंच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
समाज कल्याण विभागाच्या वतीने ११ घरकुले मंजूर झाली आहेत. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची प्लॅस्टिक क्रेट्स खरेदी लवकरच करण्यात
येणार असून, त्याचेही वाटप केले जाणार असल्याची माहिती यावेळी सभापती शिवांगी वसंत पवार यांनी दिली. (वार्ताहर)