शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

वलखेड-ननाशी रस्ता रूतला मातीत

By admin | Updated: May 5, 2014 20:09 IST

सदस्य संगीता ढगे यांचा उपोषणाचा इशारा

सदस्य संगीता ढगे यांचा उपोषणाचा इशारानाशिक : ननाशी ते वलखेड या सुमारे दहा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या ७० ते ८० गावांतील वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाची चौैकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संगीता राजेंद्र ढगे यांनी दिला आहे.यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे रस्त्याच्या कामाची तक्रार करण्यात येणार असल्याचेही संगीता ढगे यांनी सांगितले. वलखेड-ननाशी हा रस्ता तालुक्यातील प्रमुख रस्ता असून निगडोळ, पाडे, नळवाडपाडा, वणी खुर्द, ठेपणपाडा, नळवाडी, ननाशी, जोरण आदि प्रमुख गावांना हा रस्ता जोडणारा आहे. तसेच ननाशीमार्गे सुरगाण्याला जोडणाराही हाच रस्ता असल्याने या रस्त्यावरून दिंडोरी व सुरगाणा तालुक्यांतील ७० ते ८० गावातील लोक दररोज प्रवास करतात. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता दुरुस्तीसह साईडप˜्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नागरिकांनी मागणी केल्याने त्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजुर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली, मात्र बाजूने रस्ता मजबुतीकरणासाठी आवश्यक ते दगड व मुरूम न वापरता कडेला खोदलेली मातीच त्यावर टाकण्यात आल्याने या रस्त्यावरून येणारी व जाणारी वाहने कडेला खोदलेल्या व मातीने बुजविलेल्या रस्त्याच्या मधोमध रूतत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्यात दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभाग अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे या कामाची अधीक्षक अभियंता व गुणवत्ता नियंत्रण विभागाने चौकशी करावी, या मागणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचे संगीता राजेंद्र ढगे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)