सॉफ्टबेसबॉल निवड चाचणी स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:14 IST2019-02-08T16:14:09+5:302019-02-08T16:14:22+5:30

नाशिक : राज्य स्तरिय सॉफ्टबेसबॉल मुले व मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा येथील इंदिरा नगर येथे संपन्न झाल्या.

 Soft Baseball Selection Test Championship prize distribution | सॉफ्टबेसबॉल निवड चाचणी स्पर्धेचे बक्षीस वितरण

सॉफ्टबेसबॉल निवड चाचणी स्पर्धेचे बक्षीस वितरण

ठळक मुद्देसॉफ्टबेसबॉल हा खेळ महाराष्ट्रा बरोबर देशभरात व अशिया खंडात वाढत असल्याने या खेळाला उजवल भविष्य आहे,असे सॉफ्टबेसबॉल फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिंदे यांनी सांगितले,महाराष्ट्रातून १५ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला,या स्पर्धे मधून महाराष्ट्र संघाची निव


नाशिक : राज्य स्तरिय सॉफ्टबेसबॉल मुले व मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धा येथील इंदिरा नगर येथे संपन्न झाल्या.
निवड झालेला संघ इंदापूर पुणे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल अशी माहिती सॉफ्टबेसबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्राचे सचिव व स्पर्धा आयोजक बाळासाहेब रणशुर यानी दिली,या प्रसंगी नगर सेवक शाम बडोदे,मुख्याध्यापक शरद गिते,सागर देशमुख,दिनेश अहिरे,दत्तगिरी गोसावी,संजय पाटील आदि उपस्थित होते,
-स्पर्धेचा निकाल
*मुले*
प्रथम -नाशिक जिल्हा
द्वितीय-पुणे जिल्हा
तृतीय-नवी मुंबई
*मुली*
प्रथम -प्रिंप्रिचिंचवड
द्वितीय-नवी मुंबई
तृतीय-अहमदनगर
स्पर्धा यशस्वी करण्या साठी क्र ीडा प्रेरणा चे संजय पाटील,गणेश राऊत प्रवीण भोसले,प्रभाकर सूर्यवंशी,प्रशांत पाटील, गिरीश गर्गे,विनायक शिंदे ,अस्लम मुल्ला,कौस्थूभ रावळ,राम जाचक,रोहन जोशी ,विशाल खंदारे,अभिनव खरे यांनी परिश्रम घेतले,कार्यक्र माचे सुत्र संचलन राजेश भूसारे यांनी केले आभार संजय निकम यांनी मानले.(08सॉफ्टबॉल)

Web Title:  Soft Baseball Selection Test Championship prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.