शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

समाजशिल्पी तुकाराम दिघोळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 01:09 IST

राज्याचे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली...

राज्याचे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली...

सिन्नर तालुक्याच्या विकासात आणि वैभवात भर घालणारे जे लोक होऊन गेले त्यापैकी तुकाराम दिघोळे हे महत्त्वाचे नाव.  दिघोळे यांना सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करायला मिळाले आणि त्यांच्यातला समाजशिल्पी सतत जागा राहिला.  आमदार म्हणून काम करताना त्यांनी रचनात्मक कामाला महत्व दिले.  त्यांच्या रचनात्मक कामांपैकी माळेगावची औद्योगिक वसाहत हे पहिले उदाहरण.  त्यातून सिन्नर तालुक्यात औद्योगीकरणाला गती मिळाली आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळाला.  त्यामुळे सिन्नरच्या अर्थव्यवस्थेला गती आली.  सिन्नर तालुक्याबरोबरच शहराचा विकास , विस्तार होत गेला . तुकाराम दिघोळे यांनी क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक या शिक्षण संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली.  तोपर्यंत माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ही संस्था काम करीत होती. दिघोळे यांनी संस्थेला उच्च शिक्षणाकडे नेले.  संस्थेची आज महाविद्यालये सुरू झाली आहेत.  दिंडोरी आणि नाशिक येथे असणारी ही महाविद्यालये आपला नावलौकिक राखून आहेत.  त्याच बरोबर दिघोळे यांनी व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन आय टी आय , इंजिनिअरिंग कॉलेजचेस सुरू केली .  थोडक्यात नाशिक जिल्ह्यात या संस्थेचा जो विकास झाला तो तुकाराम दिघोळे यांच्या दूरदृष्टीतून झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  नामदार दिघोळे यांना सिन्नर तालुक्यातून प्रथमतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणे आणि तेथेही स्वतःचा लौकिक संपादन केला . समाजातील सर्व थरातील माणसांशी त्यांचा संपर्क होता.  गावागावात त्यांना ओळखणारे , मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत.  त्याचा उपयोग त्यांनी राजकारण,  समाजकारण , शिक्षण,  सहकार या क्षेत्रात काम करताना करून घेतला. 

             दूरदृष्टीने वाटचाल करणारे तुकाराम दिघोळे यांची आज पहिली पुण्यतिथी.  त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत असे.  आता त्यांचे पुण्यस्मरण आपल्याला करावे लागते आहे.  उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची जनरीत आहे. तरीसुद्धा तुकाराम दिघोळे,  एन एम आव्हाड,  नानासाहेब गडाख ही सूर्यासारखी माणसे आपल्यात नसली तरी त्यांचे योगदान विसरता येत नाही . दिघोळे आज आपल्यात नाहीत तरीसुद्धा सिन्नरच्या तहानलेल्या मातीला विकासाची गती दाखवणाऱ्या दिघोळे यांना विसरता येत नाही . 

        तुकाराम दिघोळे यांचे  कायमचे स्मरण व्हावे यासाठी काही रचनात्मक विधायक उपक्रम केला जावा असे मला वाटते.  त्यातून  दिघोळे यांचा आठव होत राहील.  आपली पुढची पिढी स्मार्ट आहे. ही पिढी घडवण्याचे काम दिघोळें सारख्या माणसांनी अहोरात्र परिश्रम करून केले आहे . त्याची नोंद, दखल समाजाने घेतली पाहिजे असे मला वाटते. 

- डॉ. शंकर बोऱ्हाडे

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक