शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पीककर्जासाठी सोसायट्या आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:20 IST

राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी लाभ द्यावा : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दबाव आणण्यास सुरुवात

नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या फेडरेशनची नुकतीच बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हा बॅँकेमार्फत शेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया विविध कार्यकारी सोसायट्यादेखील जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षांपासून अडचणीत आल्या होत्या. आता मात्र शासनाने दोन लाख रुपये पीककर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व त्याचा लाभ जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना मिळाला आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचे थकबाकीदार असलेल्या व नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज दिले जात नाही. याबाबत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिल्यास सोसायट्यांना जीवदान तर मिळेलच; परंतु कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकºयांना उभे राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हा बॅँकेने लवकरात लवकर कर्जपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा फेडरेशनच्या वतीने शेतकºयांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फेडरेशनचे नेते विष्णुपंत गायखे, राजू देसले, भाऊसाहेब गायकवाड, संजय गायधनी, संपतराव वक्ते, मनोहर देवरे, सोमनाथ गायकवाड यांनी दिला आहे.कर्जपुरवठा करण्याची मागणीराज्य सरकारने जिल्हा बॅँकेने ज्या शेतकºयांचे कर्जमाफ केले, त्यापोटी सुमारे आठशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा बॅँकेला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मिळालेल्या अनुदानातून जिल्हा बॅँकेने नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना यंदा पीककर्जासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा, अशी भूमिका फेडरेशनने घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीbankबँक