सोसायटींच्या निवडणुका घोषित
By Admin | Updated: September 21, 2015 22:23 IST2015-09-21T22:23:29+5:302015-09-21T22:23:55+5:30
सोसायटींच्या निवडणुका घोषित

सोसायटींच्या निवडणुका घोषित
मालेगाव : तालुक्यातील चार सोसायट्यांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या असून, २५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
यात जळगाव (गा), एरंडगाव, जळकू, लोणवाडे व वाके या गावांचा समावेश आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १९ ते २३ सप्टेंबर या काळात सकाळी ११ ते २ यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी, अर्ज माघारीसाठी २८ सप्टेंबर ते १२ आक्टोंबर ११ ते २ अशी वेळ देण्यात आली आहे. १३ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, या सोसायटींच्या निवडणुकांसाठी २५ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. हे मतदान झाल्यानंतर अर्ध्यातासांनी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. असा निवडणूक कार्यक्रम असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.