समाज कल्याणमधील बारा पंख्यांची चोरी
By Admin | Updated: November 12, 2016 23:52 IST2016-11-12T23:49:39+5:302016-11-12T23:52:36+5:30
समाज कल्याणमधील बारा पंख्यांची चोरी

समाज कल्याणमधील बारा पंख्यांची चोरी
नाशिक : नासर्डी पुलाजवळील समाज कल्याण विभागाच्या प्रशिक्षण हॉलमधील सात हजार २०० रुपये किमतीचे बारा पंखे चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या विभागाच्या अधिकारी पल्लवी पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली आहे़ याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)