शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,

By azhar.sheikh | Updated: August 14, 2018 14:29 IST

राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे.देशभक्ती ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का?तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागेल!

अझहर शेख नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशप्रेम, देशभक्तीचे भरते आले आहे. ‘डीपी’, ‘प्रोफाईल’, ‘स्टेटस’देखील नेटिझन्सकडून बदलले जात आहेत.राष्ट्रभक्तीचा हा उत्साह वाखाण्याजोगा नक्कीच आहे; मात्र यासोबत आपल्या राष्ट्राचे आपण आदर्श नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. आपण साधा सिग्नलदेखील अनेकदा पाळत नाही, तर मग आपल्या देशाभिमानाला काय अर्थ राहतो? हे तरुणाईने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन वगळता अन्य दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम, देशाविषयीची आपुलकी, करुणा का आठवत नाही? देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कर्तव्याच्या माध्यमातून कधी पार पाडणार आहोत? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहिलेला आहे.देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. केवळ स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रप्रेम मनात जागृत न करता हे राष्ट्रप्रेम वर्षाचे बारामहिने जागृत ठेवण्याचीराष्ट्रउभारणीसाठी गरजेचे आहे.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्र सण आहेत. या तारखांना आपण सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतो अन् देशप्रेमाचा बेभान होऊन विसरतो. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी १५ आॅगस्टला बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपरचा कचराही सर्रासपणे पर्यटनस्थळांवर फेकून घरी परततो. कचऱ्याची विल्हेवाटदेखील योग्यरित्या लावू शकत नाही? राष्ट्रप्रेम, देशभक्ती केवळ  ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का? याचा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. आपण आपल्यापासून जर बदल घडविला तर आपोआप समाज बदलेल मात्र नेमके समाज बदलत नाही, तर आपण का बदलायचे असा विचार मनात आणला जातो आणि तेथेच गल्लत होते व राष्ट्रउभारणीचे काम मागे पडते.

एक आदर्श भारतीय नागरिक बनण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करु आणि आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणू तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सार्थकी लागेल!

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNational Flagराष्ट्रध्वजIndiaभारत