सोशल मीडियावर युवतीचे फोटो टाकून बदनामी
By Admin | Updated: March 20, 2017 00:25 IST2017-03-20T00:25:06+5:302017-03-20T00:25:21+5:30
नाशिक : एकतर्फी प्रेमातून युवतीसोबत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधून एका युवकाने दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावरील फेसबुकवर टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे़

सोशल मीडियावर युवतीचे फोटो टाकून बदनामी
नाशिक : एकतर्फी प्रेमातून युवतीसोबत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधून एका युवकाने दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावरील फेसबुकवर टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील एका एकवीसवर्षीय मुलीसोबत एकतर्फी प्रेमातून संशयित अखंड प्रताप बिरबलसिंग (रा़ शिवाजीनगर, सातपूर) याने वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधला़ यानंतर त्या दोघांचे फोटो फेसबुकवर टाकून बदनामी केली़ याबरोबरच युवतीचा विवाह ठरलेल्या युवकास धमकी दिली़ याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी संशयित सिंगविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़