शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बॅँकांमध्येही ठेवावे लागणार सोशल डिस्टन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:29 IST

नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात त्यांनी बॅँकासाठी नियमावलीच तयार केली असून त्यात अनेक प्रकारच्या स्वच्छता सेवा सक्तीच्या केल्या आहेत.

ठळक मुद्देमनपाची नियमावलीएटीएममध्येही सॅनिटायझर

नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात त्यांनी बॅँकासाठी नियमावलीच तयार केली असून त्यात अनेक प्रकारच्या स्वच्छता सेवा सक्तीच्या केल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकारचे उपाय केले असून सध्या नाशिक जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असून त्यात किराणा दुकाने, औषधालये, बॅँका आणि पेट्रोल पंपांचा समावेश आहे. बॅँकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निर्बंध लागू केले असून त्याअंतर्गत एकावेळी बॅँकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काऊंटरसमोर देखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतर देखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बॅँकेसाठी नियमावलीच तयार केली आहे.

बँका आणि एटीएम मध्ये देखील सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व बँकांनी आपल्या बँकांचा व एटीएमच्या दर्शनी भागावर दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्र मांक व व्हाट्सअँप क्र मांक ठळक जागी लावावेत.तसेच प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामासिक अंतर ठेवून बँक व एटीएम मध्ये व बाहेर मार्किंग करावे.बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हँड ग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक बँक आणि एटीएम मध्ये प्रवेश करताना बँकेमार्फत सँनिटायझर उपलब्ध करून द्यावे. रांगेतील प्रत्येक व्यक्तीच्या वर हातावर सँनिटायझर टाकल्यानंतर त्याने हात स्वच्छ केल्यानंतरच बँकेत अथवा एटीएम येथे प्रवेशास परवानगी द्यावी. ज्या बँक व एटीएम मध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजना नुसार बँकांनी कामाचे तास व बँक बंद अथवा चालू ठेवण्याची वेळ याबाबत नियोजन करावे.तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करु न द्याव्यात असे नियमच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका