कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

By Admin | Updated: May 4, 2016 23:48 IST2016-05-04T23:41:03+5:302016-05-04T23:48:16+5:30

कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

Social commitment to working days | कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

 सातपूर : कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सीटू युनियनच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट त्यात कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. सिन्नर तालुक्यातील आत्महत्त्या केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या वारसांना सीटू युनियनच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रु पयांची आर्थिक मदत देण्यात आली. कामगार दिनानिमित्त सीटू भवन येथे आयोजित कार्यक्र मात ही आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माकपचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बुरांगे, नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, सतीश खैरनार, कल्पना शिंदे, अनिल भागवत, दगडू व्हडगर आदि उपस्थित होते.
कामगाराचे भवितव्य पुढील काळात अवघड व अडचणीचे ठरणार आहे. यासाठी व्यापक चळवळीची आवश्यकता आहे. कामगार व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सीटू खंबीरपणे पाठीशी उभी राहील, यासाठी कामगार व शेतकरी एकजूट असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सीटूचे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Social commitment to working days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.