येवला तालुका सैनिक ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:48+5:302021-08-15T04:16:48+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव येथील शहीद जवान गुलाब कदम यांच्या वीरमाता पुष्पाबाई कदम यांची येवला तालुका सैनिक ...

येवला तालुका सैनिक ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव येथील शहीद जवान गुलाब कदम यांच्या वीरमाता पुष्पाबाई कदम यांची येवला तालुका सैनिक ग्रुपने जबाबदारी घेत उदरनिर्वाहासाठी १ लाख ३५ हजारांचा निधी जमा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
नेऊरगाव येथील पुष्पाबाई कदम मोठा मुलगा गुलाब कदम २७ डिसेंबर २००१ मध्ये जम्मू काश्मीर येथे शहीद झाले, याचे दुःख वीर मातेच्या मनाशी कायम असतानाच पतीचे वृद्धापकाळाने निधन झाले. पतीच्या नावावर येत असलेली पेन्शन बंद झाल्याने लहान सूनबाई मोलमजुरी करून सांभाळ करत होती. या मातेच्या वेदना येवला तालुका सैनिक ग्रुपने जाणून घेत सामाजिक बांधिलकी जोपासत १ लाख ३५ हजारांचा जमा निधी एस.बी.आय. शाखेत वीरमातेच्या नावे अकाउंट खोलत बँक मॅनेजर जयेश यांच्या उपस्थितीत जमा केले. वीरमातेची पेन्शन तात्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
यावेळी येवला तालुका सैनिक ग्रुप प्रमुख सुशील शिंदे, येवला तालुका सैनिक ग्रुप उपप्रमुख सुरेश धनवटे, सुभेदार अरुण कोकाटे, जळगाव नेऊर गट अध्यक्ष आनंद गुंड, सायगाव गट अध्यक्ष विजय चव्हाण, भारम गट अध्यक्ष दिलीप शिंदे, मुखेड गट अध्यक्ष आदमने, मुखेड गट उपाध्यक्ष सचिन वाघ, मेजर माने, एस.बी.आय. बँक मॅनेजर जयेश, आजी -माजी सैनिक, उपस्थित होते.
-----------------------
वीरमाता, वीरपत्नी, सैनिक परिवार यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्या अडचणी सैनिक ग्रुप सोडविण्यासाठी तत्पर आहे. ‘जय जवान जय किसान’ या उक्तीप्रमाणे सैनिक सीमेवर लढतो; पण सैनिकांना साथ देणारा हा शेतकरी आहे म्हणून सैनिक ग्रुप मदत करत राहील.
- सुशील शिंदे, येवला तालुका सैनिक ग्रुप अध्यक्ष
------------------
येवला तालुक्यातील नेऊरगाव येथील वीरमाता पुष्पाबाई कदम यांना मदतप्रसंगी उपस्थित सैनिक ग्रुप अध्यक्ष सुशील शिंदे, सुनील धनवटे, सुभेदार अरुण कोकाटे. (१४ जळगाव नेऊर १)
140821\14nsk_12_14082021_13.jpg
१४ जळगाव नेऊर १