चांदवडला विजयादशमीनिमित्त संघातर्फ फलक लावून समाज जागृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:32 IST2020-10-26T19:47:34+5:302020-10-27T00:32:01+5:30
चांदवड : येथे राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी असे फलक घेऊन कोरोना पार्श्वभूमीवर समाजजागृत्ती केली.

चांदवड येथे राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी असे फलक घेऊन कोरोना पार्श्वभूमीवर समाजजागृत्ती केली.
चांदवड - चांदवड शहरात राष्टÑीय स्वयंसेवक संघातर्फे यंदा विजयादशमीनिमित्त निघणारे संचलन रद्द करण्यात आले. मात्र कोवीड -१९ च्या धर्तीवर समाजजागृत्तीसाठी चांदवड शहरातील वर्दळीच्या पंधरा ठिकाणी स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत कोविड साथीपासून स्वताचा व समाजाचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा, निरोगी राहा, २० सेंकदापर्यंत हात धुवा, सामाजिक अंतर ठेवा , गर्दी करु नका, कोरोनापासून बचावासाठी शासनाचे नियम पाळा अशा प्रकारचे विविध फलक घेऊन उभे होते. कोविड या साथीपासून संपुर्ण मानवजातीचे सरंक्षण करण्यासाठी व संपुर्ण जग कोरोनामुक्त करणे हेच विजयादशमीच्या दिवशी आमचे सीमोल्लंगन असल्याचे जिल्हा कार्यवाह यांनी सांगीतले. यावेळी तालुका कार्यवाह दिनकरराव इंगळे, दिनेश देशमुख, कल्पेश आबड, शांताराम हांडगे, प्रतिक वडनेरे, गणेश भोसले, किशोर बिरारी, अंकुुश ठाकरे या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.