शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? विनायक मेटे यांचे राज्य शासनावर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:39 IST

नाशिक : कोरोनाच्या बाबतही जर विठूमाउलीच सगळं काही करणार असेल तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? मुख्यमंत्र्यांनी पण हात टेकले असतील आणि विठ्ठलानेच सारं काही हाती घ्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायऊतार व्हावे, अशा शब्दात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या शासनाला मराठा आरक्षणाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्यानेच गत सहा महिन्यांत मराठा आरक्षण, शिवस्मारक आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची एकही बैठकदेखील झाली नसल्यावरून शासन मराठाविरोधी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र शासन मराठाविरोधी

नाशिक : कोरोनाच्या बाबतही जर विठूमाउलीच सगळं काही करणार असेल तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? मुख्यमंत्र्यांनी पण हात टेकले असतील आणि विठ्ठलानेच सारं काही हाती घ्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायऊतार व्हावे, अशा शब्दात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या शासनाला मराठा आरक्षणाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्यानेच गत सहा महिन्यांत मराठा आरक्षण, शिवस्मारक आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची एकही बैठकदेखील झाली नसल्यावरून शासन मराठाविरोधी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.नाशिक दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी, शिवस्मारकासाठी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाबाबत गत सहा महिन्यांत अद्यापही बैठकच झालेली नाही. मराठा आरक्षणावेळी घालण्यात आलेल्या अनेक केसेस कार्यकर्त्यांवर अद्यापही कायम आहेत. आरक्षणादरम्यान ज्या आंदोलकांनी बलिदान दिले, त्यांच्या वारसांना दहा लाख आणि शसकीय नोकरीचे आश्वासन तत्कालीन शासनाने दिले होते. त्याबाबतदेखील शासनाने पुढे काहीच केलेले नाही. गत सहा महिन्यांत मराठा समाजाशी निगडीत एकही प्रश्न या शासनाने हाताळला नसून हे शासन मराठाविरोधी असल्याचा समज जनतेत पसरत चालला आहे. हे अत्यंत निराशावादी सरकार असून, या शासनाने मराठा समाजाचाही कोणताही प्रश्न हाती न घेता केवळ समाजाला गृहित धरले असल्याचा आरोपदेखील मेटे यांनी केला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्टिंग आॅपरेशन केले, पण त्याचा फायदा काय? कुणावर कारवाई केली? बोगस कंपन्यांवर कारवाई नाही, शासनाच्या महाबीज कंपनीचे बियाणे बोगस निघाले, त्यांच्यावर काय कारवाई केली? सारीच परिस्थिती आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच आहे. नुकसानभरपाईदेखील शासनाने जाहीर केली नसून, मग दादा भुसे यांनी स्टिंग काय केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी केले काय? असा सवालदेखील मेटे यांनी उपस्थित केला.

 

 

टॅग्स :NashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षण