शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

...तर अधिवेशन बंद पाडू!

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

पीक विमा योजना बदला : आजी-माजी विरोधी पक्षनेत्यांनी दिला राज्य सरकारला इशारा

नाशिक : अवकाळी पावसामुळे नाशिकसह राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे पाप घेण्यापेक्षा राज्य सरकारने आठ दिवसांत तत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनाला बंदी घालू, असा इशारा विरोधी पक्षनेते आमदार एकनाथ शिंदे व माजी विरोधी पक्षनेते आमदार रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.विरोधी पक्षनेत्यांनी शुक्रवारी (दि. २१) माडसांगवी, ओझर व खडकजांब या गावांना भेटी देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नव्हे, तर विमा कंपनीच्या सोयीची आहे. अडीच लाखांच्या पीक विम्याला नऊ हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची लूट होत असून, शेतकऱ्यांना कवडीचा लाभ झालेला नाही. मराठवाड्यात पीक विमा योजनेत ३२ कोटी जमा झाले; मात्र शेतकऱ्यांना एक रुपयाचे नुकसान होऊ दिलेले नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेली नगदी पिके गेली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आठ दिवसांच्या आत राज्य सरकारने मदत जाहीर न केल्यास शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनास उपस्थित राहू देणार नाही. नुकसानीमुळे बागलाण व देवघट येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तर त्याला थेट मुख्यमंत्री व सचिवांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस आपणच केली होती? मग आता तुमच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करणार काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार, बागायतीसाठी ५० हजार, तर फळबागांसाठी एकरी एक लाख मदत जाहीर करावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीत बसू देणार नाही, असेही आमदार शिंदे व कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)