‘...तो हमारे अब्बु अभी जिंदा रहते थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:34+5:302021-04-23T04:16:34+5:30

नाशिक : ‘हमारे अब्बु को ॲडमिट किये हुये, तीन दिनही हुये थे, लेकिन उनकी हालत काफी सुधर रहीं थी, ...

‘... so our father was still alive’ | ‘...तो हमारे अब्बु अभी जिंदा रहते थे’

‘...तो हमारे अब्बु अभी जिंदा रहते थे’

नाशिक : ‘हमारे अब्बु को ॲडमिट किये हुये, तीन दिनही हुये थे, लेकिन उनकी हालत काफी सुधर रहीं थी, डॉक्टरभी बोले की दो दिन बाद डिस्चार्ज मिल जायेंगा, उनका ऑक्सिजन सॅच्युरेशन भी अच्छा हुवा था... लेकिन अचानक ये हादसा हुवा और सब कुछ खत्म...! सिलिंडर लाने-लेजाने तक जो वक्त गुजरा उसमे अब्बु हमेशा के लिये हमें छोड के चले गये....! या भावना त्यांच्याच शब्दांत दुर्घटनेचे बळी ठरलेले भय्या सांडुभाई सय्यद यांच्या कुटुंबीयांच्या आहेत. ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

येथील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि. २१) दुपारी अचानकपणे ऑक्सिजन टाकीला गळती लागली अन‌् अनर्थ घडला. रुग्णालयात मृत्यूच्या तांडवासोबतच नातेवाइकांचा सुन्न करणारा आक्रोश सुरू झाला. जी ती व्यक्ती आपल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी धावत सुटली. या वेळी सय्यद यांची दोन्ही मुले नदीम व साहील तसेच त्यांचे मित्र मुस्तकीम कुरेशी, ताबीश सय्यद, मोईन शेख, सकलेन शेख, इरफान कुरेशी यांनीही दुचाकींनी धावाधाव करीत घरी असलेला निम्मा भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तसेच गॅरेजमधील एक असे दोन सिलिंडर तत्काळ रुग्णालयात आणले. भय्या सांडुभाई सय्यद (५९, रा. लव्हेंडर-२ रॉयल कॉलनी, पखालरोड) यांना ऑक्सिजन सिलिंडर लावला. हे दोन्ही सिलिंडर निम्मेच असल्यामुळे ते लवकर संपणार असल्याने हे तरुण पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीकडे सिलिंडर आणायला धावले. तेथून पुन्हा रुग्णालयात येईपर्यंत वेळ लागला आणि यादरम्यानच ऑक्सिजनचा दाब कमी होत गेल्याने सय्यद यांचा श्वास कायमचा थांबला.

--इन्फो--

अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंब

भय्या सय्यद यांचे मूळ गाव येवला तालुक्यातील राजापूर. अत्यंत मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंब असून ते स्वत: ड्रायव्हर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. एका मुलाचा आणि मुलीचा विवाह झाला असून, एक मुलगा अविवाहित आहे. या कुटुंबाने आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र नियतीने त्यांच्या प्रयत्नांना अखेरपर्यंत यश येऊ दिले नाही.

---इन्फो--

‘...और वो लेडिज पेशंट की जान बच गयी’

‘दुसरा सिलिंडर लेके हम हॉस्पिटल में पहुंचे तब हमारे अब्बु रुख्सत हों चुके थे, और वॉर्ड में दुसरे बेड पें लेटी लेडिज पेशंट की सांसे अटक रहींं थी. ये देखकर तुरंत वो सिलिंडर हमने वो पेशंट को दे दिया और उसकी जान बच गयी.’ हा प्रसंग नदीम व साहील या भावंडांनी बोलून दाखविला. आपल्या वडिलांना गमावल्याचे दु:ख असतानाही, दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचावेत, या भावनेतून त्यांनी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दाखविलेले प्रसंगावधान त्या महिला रुग्णाला जीवदान देणारे ठरले.

--

फोटो आर वर२२ भय्या नावाने सेव्ह आहे. (मयत)

===Photopath===

220421\22nsk_27_22042021_13.jpg

===Caption===

भैय्या सांडुभाई सय्यद

Web Title: ‘... so our father was still alive’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.