शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप

By अझहर शेख | Updated: February 28, 2023 18:40 IST

नाशिकच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला लेखी इशारा

नाशिक : नांदगाव तालुक्यातील मौजे सजा-साकोरे, पांझण, डॉक्टरवाडी भागातील वनजमिनी शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती. या जमिनीवर एका खासगी कंपनीकडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने राखीव वनजमिनीचा सौदा झाल्याचे उपवनसंरक्षकांच्या पत्रातून समोर आला. येथील शेतकऱ्यांना बळजबरीने जमिनी कसण्यापासून रोखत त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप करत पिडित शेतकरी महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी धडक दिली. अपर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत दोन दिवसांत प्रशासनाने दखल घेतली नाही, ‘तर आम्ही कसत असलेल्या जमिनीवर स्वत:चे सरण रचून जीवन संपवू असा इशारा यावेळी भूमीहीन शेतरकऱ्यांनी दिला.

साकोरे येथील जुन्या गट क्रमांक ८०१पैकी मौजे पांझणच्या सरकारी पडीत जमिनीवर केलेले वतीधारकांचे कब्जे कायमस्वरूपी करून त्यांना शेतीचा उतारा दिला जावा. तसच सौर उर्जा कंपनीच्या अतिक्रमणाची चौकशी करून वन विभागाचा ना हरकत दाखला नसतानाही कंपनीकडून केले जाणारे बांधकाम तत्काळ बंद करावे, या मागण्यांसाठी राज्य किसान सभा, जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत फलक झळकावले. तसेच येथील मध्यवर्ती सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत ठिय्या देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न यावेळी पिडित शेतकऱ्यांनी केला.याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, नांदगाव तहसिलदार सर्वांना लेखी स्वरुपात यापुर्वीही निवेदने दिली आहेत; मात्र कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता पुन्हा जर गुंडांनी धमकावले आणि जमिन कसण्यापासून रोखले तर त्याच जमिनीवर भूमिहीन शेतकरी स्वत:ला संपवून घेतील, असे लेखी पत्रात म्हटले आहे. तब्बल वीस भूमिहिन शेतकऱ्यांनी असे आत्महत्या करण्याचे पत्र यावेळी प्रशासनाकडे सुपुर्द केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, प्रकाश भावसार यांच्यासह स्थानिक कब्जेदार शेतकरी माणिक हिरे, तुकाराम सोनवणे, ताराबाई बोरसे, सुमन साळुंके, शिवाजी जाधव, राजेंद्र सुर्वे, रमेश कदम, प्रकाश भावसार रत्नाबाई अहिरे, सुपादाबाई अहिरे, साहेबराव झेला आदी उपस्थित होते.

गुंडांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राज्य किसान सभेच्या नेतृत्वात वीस पिडित भुमीहिन पुरूष, महिला शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना स्वतंत्ररित्या लेखी पत्र देत आत्महत्येचा इशारा दिला आहे. या पत्रात त्यांनी नांदगाव तालुक्यात कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी बाऊन्सर घेऊन येणाऱ्या गुंडांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी