शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:24 IST

नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली जाणार आहे.

ठळक मुद्देनाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली जाणा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली जाणार आहे.दरवर्षी १ जुलैपासून महिनाभर वनमहोत्सव राज्यस्तरावर साजरा केला जातो. मागील वर्षी ५० कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्ट तत्कालीन सरकारने पूर्ण केले. यावर्षी नव्या सरकारकडून प्रारंभी राज्यात दहा कोटी रोपांची लागवड करून वनमहोत्सव साजरा करण्याची घोषणा केली गेली; मात्र कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला वनमहोत्सवाचे अभियान रद्द करत या निधीपैकी ६७ टक्के निधी कोविड उपाययोजांकडे वळवावा लागल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली. यामुळे यंदा वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात साजरा होणार नाही. मात्र स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड वनजमिनीवर केली जाणार आहे.यासाठी कुठल्याहीप्रकारचे उद्दिष्ट वनखात्याने ठेवलेले नाही; मात्र वनविभाग प्रादेशिकच्या पूर्व व पश्चिम भागाकडून राज्य आराखड्यांतर्गत वृक्षलागवडीचे ‘टार्गेट’ पार पाडले जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १५० हेक्टरवरील वृक्षलागवडीसाठी मात्र पश्चिम वनविभागाकडे निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. वनमहोत्सवाचा कालावधी सप्टेंबरपर्यंत असल्याने नागरिकांनाही यानिमित्त वाजवी शासकीय दराने रोपे दिली जाणार आहेत.नाशिक पश्चिम भागाकडे एकूण ७ लाख २९ हजार रोपे वाढीव स्वरूपात तयार आहेत. यामधून विविध शासकीय आस्थापनांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार शासकीय दराने रोपांचा पुरवठा केला जाणार आहे; एखाद्या अस्थापनाच्या प्रमुखांनी अनुदानाची अडचण लेखी स्वरूपात सांगितल्यास संबंधितांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोफत रोपे देण्याची तयारी नाशिक पश्चिम वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागानेही केली आहे.१८ लाख रोपे उपलब्धनाशिक पश्चिम वनविभागाकडे विविध रोपवाटिकांमध्ये एकूण १८ लाख ८३ हजार रोपांची सध्यिस्थतीत उपलब्धतता आहे. या विभागाकडून नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिक्षेत्रांतर्गत विविध गावांमध्ये ३२ हेक्टर जागेवर एकूण ११ लाख ५४ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल