महिलेची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST2020-12-03T04:24:35+5:302020-12-03T04:24:35+5:30

जयभवानीरोड, आडकेनगर येथील सुशीला रूपसिंग तोमर (५०) या देवळाली गावात आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी ...

Snatched the woman's gold chain | महिलेची सोनसाखळी हिसकावली

महिलेची सोनसाखळी हिसकावली

जयभवानीरोड, आडकेनगर येथील सुशीला रूपसिंग तोमर (५०) या देवळाली गावात आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात तीन संशयित महिलांनी तोमर यांच्या गळ्यातील २३ ग्रॅमचे चाळीस हजारांचे मंगळसूत्र गळ्यातून काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तमंदिरला टेम्पोचालकाला लुटले

नाशिकरोड : सोलापूर जिल्ह्यातील टेम्पोचालकाला दत्तमंदिर सिग्नलजवळ रिक्षात आलेल्या दोघांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवत पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून लुटले. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील कुरुल येथील टेम्पोचालक संतोष सुखदेव लांडे हे रविवार रात्री दीडच्या सुमारास नाशिकरोडहून द्वारकेकडे जात होते. दत्तमंदिर सिग्नलजवळील दंडे ज्वेलर्स येथे रिक्षामधून आलेल्या दोघांनी टेम्पो थांबवला. लांडे यांना मारहाण करत त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. नंतर रिक्षातून दोघेजण पळून गेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Snatched the woman's gold chain