शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:07 IST

मनमाड: धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाची पर्स लांबवणाऱ्या चोरट्याच्या अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या सराईत गुन्हेगाराकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमनमाड : लोहमार्ग पोलिसांची कारवाई

आरती प्रमोद दळवी रा. मरावती ते पुणे असा प्रवास करत होत्या. रात्री बर्थवर झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातात अडकवलेली पर्स ओढून धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र दळवी यांनी विरोध केला असता झटापटीत त्यासुद्धा गाडीतून पडून जखमी झाल्या. चोरट्याने अंधाराचा फायदा घेत गाडीतून उतरून पलायन केले. गाडीतील प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली व जखमी दळवी यांना गाडीत बसवले. याबाबत प्रवासी महिलेची मुलगी हर्षदा प्रमोद दळवी यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तपासाची चक्रे फिरवली. दिनेश पवार, संतोष भालेराव, रूपेश ढवळे, रोशन गोंडेकर, गणेश खैरनार, रेसुब कर्मचारी सागर वर्मा, दादाराव सदरे यांच्या पथकाने रेल्वे परिसर पिंजून काढला. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.फलाट क्रमांक सहाच्या दिशेने असलेल्या भारतनगरमध्ये भंगार दुकानाच्या बाहेर झोपलेल्या आकाश रतन मोरे याच्या डोक्याला दवाखान्याची पट्टी बांधलेली असल्याची गुप्ता माहिती मिळाल्याने संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता महिला प्रवाशाकडून चोरलेली पर्स, दोन मोबाइल, आधारकार्ड व रोख रक्कम असा सात हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी