शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या कार्यक्रमावरुन येताना काळाची झडप; ट्रकच्या धडकेत दोघे मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:45 IST

श्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरुन पुणे महामार्गापासून वळण घेत मुंबईकडे जाणारी अवजड वाहतुक वडाळामार्गे राजसारथी कलानगर येथून पुढे राजीवनगरमार्गे मुंबई महामार्गावरुन रवाना होतात. या अवजड वाहतुकीमुळे लोकवस्तीमधील सुरक्षितता धोक्यात येत आहे.

ठळक मुद्देराजीवनगरजवळ दुर्घटनाअवजड वाहतुकीमुळे सुरक्षितता धोक्यात

इंदिरानगर : पंचवटी परिसरातून बहिणीची हळद आटोपून राजीवनगरकडे दुचाकीने परतत असताना दोघा युवकांवर काळाने घाला घातला. एका मालवाहु अवजड ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाल. या घटनेने संपुर्ण  परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुध्द इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शुभम गवळी (२२,रा.चुंचाळे), राहुल सुर्यवंशी (२५,रा.सावतानगर, सिडको) हे दोघे मित्र त्यांच्या दुचाकीने मंगळवारी (दि.९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्याने कलानगर सिग्नलवरुन डावीकडे वळण घेत राजीवनगरमार्गे मार्गस्थ होत असताना त्यांच्या दुचाकीला एका मालवाहु ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रकने (एम.एच१९ झेड ४०५४) दुचाकीला (एम,एच१८ एएम२०७८) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघा मित्रांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीत मृत्यु झाला. हा अपघात राजीवनगरजवळील वळणावर झाला. शुभम व राहुल हे त्यांच्या मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम तपोवन परिसरातून आटोपून घरी परतत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताच्या वेळी ट्रकचालकाने जखमी अवस्थेतील या दोघांना मदत करण्याऐवजी ट्रकसह घटनास्थळावरुन पोबारा केला. त्याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.-अवजड वाहतुकीमुळे सुरक्षितता धोक्यातश्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरुन पुणे महामार्गापासून वळण घेत मुंबईकडे जाणारी अवजड वाहतुक वडाळामार्गे राजसारथी कलानगर येथून पुढे राजीवनगरमार्गे मुंबई महामार्गावरुन रवाना होतात. या अवजड वाहतुकीमुळे लोकवस्तीमधील सुरक्षितता धोक्यात येत आहे. अवजड वाहतुक या मार्गे वळविण्यात आल्याने इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी विरोधही दर्शविला होता. कलानगर येथील सिग्नलजवळ वाहतुक कोंडीलाही या अवजड वाहनांमुळे निमंत्रण मिळते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातDeathमृत्यू