सिन्नर : तालुक्यातील हिवरे येथील इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ओमकार रामनाम बिन्नर ६) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ओमकार हा सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंगणात गाट्या खेळत होता. त्याचदरम्यान जवळच असलेल्या लाकडांतून आलेल्या सर्पाने त्याच्या डाव्या पायाला अंगठयाजवळील बोटाला दंश केला. मात्र ओमकारच्या हे लक्षात न आल्याने सुमारे अर्धातास तो खेळण्यात मग्न होता. तथापि काही वेळाने त्याला वेदना होवू लागल्याने त्याने आई - वडिलांना ही गोष्ट सांगितली. ओमकारला दवाखान्यात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिवरे येथे सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 13:20 IST