पिंपळगाव वाखारीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 28, 2017 00:35 IST2017-06-28T00:35:15+5:302017-06-28T00:35:55+5:30
देवळा : तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील शुभम अशोक शेळके (१०) या शाळकरी विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

पिंपळगाव वाखारीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील शुभम अशोक शेळके (१०) या शाळकरी विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
मंगळवारी (दि. २७) पहाटे ३ वाजेच्या सुमारास शुभम आईसोबत घराबाहेर पडवीत झोपलेला असताना त्याला झोपेतच कानाला विषारी सापाने दंश केला. त्याने आईला काहीतरी चावल्याने सांगितले; मात्र कीडा वगैरे चावला असेल म्हणून आईने दुर्लक्ष
केले. परंतु सकाळी शुभम उठला नाही म्हणून त्याची आई त्याला उठवण्यास गेली असता तो निपचित पडलेला होता. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय देवळा येथे दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी कळवण
येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथूनही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर पिंपळगाव (वा.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.