समाजकंटकांनी दुचाकी जाळली
By Admin | Updated: March 13, 2017 01:23 IST2017-03-13T01:23:12+5:302017-03-13T01:23:25+5:30
नाशिक : रेडक्रॉस परिसरात समाजकंटकांनी एका कामगाराची दुचाकी जाळल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़

समाजकंटकांनी दुचाकी जाळली
नाशिक : रेडक्रॉस परिसरात समाजकंटकांनी एका कामगाराची दुचाकी जाळल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर येथील ज्ञानदेव संतोष वाघ हा रविवार कारंजावरील एका दुकानात कामास आहे़ शनिवारी सायंकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने आपली हीरो होंडा (एमएच १२, एव्ही ७४८२) दुचाकी रेडक्रॉसजवळील झाडाखाली उभी केली व नातेवाइकांकडे गेला़ सकाळी आल्यानंतर बघितले असता त्याची दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली़ याप्रकरणी वाघ याच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस पुढील तपास करीत आहेत.