निफाड धुळीमुळे धुसर वातावरण
By Admin | Updated: April 6, 2015 00:48 IST2015-04-06T00:47:34+5:302015-04-06T00:48:10+5:30
निफाड धुळीमुळे धुसर वातावरण

निफाड धुळीमुळे धुसर वातावरण
निफाड : निफाड तालुक्यात रविवारी वातावरणात नागरिकांना अनाकलनीय बदल अनुभवास मिळाला. तालुक्यात दुपारनंतर धुळीमुळे धुसर वातावरण पसरले होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्याला सुर्यनारायण भाजून काढीत आहे. एव्या ३० ते ३५ दिवसात आधी गारपीटीने तालुक्याला झोडले नंतर मुसळधार पावसाने झोडले. रविवारी मात्र सकाळी ढगाळ वातावरण होते शिवाय वातावरण धुसर होते सकाळी ११ नंतर उन्हाने नागरीकांना भाजून काढले. दुपारनंतर वातावरणात धुके पसरल्यासारखे वातावरण होते मात्र निरिक्षनाअं्रती हा प्रकार धुकेही नाही व धड धुळीचे अस्तीत्वही नाही. त्यामुळे वातावरण धुसर असूनही नेमके या वातावरणाला काय म्हणावे यावर चर्चा दिवसभर नागरीकात झडत होत्या. गावच्या परिसरात त्याचे अस्तित्व जास्त दिसत होते. करंजगाव, चापडगाव, नांदूरमध्यमेश्वर परिसरात तर १ किमी अंतरात संपुर्ण वातावरण एवढे धुसर झाले की नांदूरमध्यमेश्वर येथे झालेल्या लक्षीमित्रांना पक्षीनिरिक्षणाचा आनंद घेता आला नाही व फोटोग्राफी करतांना खुपच अडथळे आले. सायंकाळी ५ नंतर गंगाथडी परिसरात या धुसर वातावरणात वाढ झालेली दिसून आली. या अनाकलनीय वातावरणात बदलाची निफाड तालुक्यात चर्चा होती.