फॅमिली फिजीशियनच्या अध्यक्षपदी स्मिता कांबळे, सचिवपदी प्रमोद अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:18 IST2017-08-28T00:18:50+5:302017-08-28T00:18:58+5:30

फॅमिली फिजीशियनच्या अध्यक्षपदी स्मिता कांबळे, सचिवपदी प्रमोद अहेर
नाशिक : फॅमिली फिजीशियन असोसिएशनच्या नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी डॉ. स्मिता कांबळे यांची, तर सचिव म्हणून डॉ. प्रमोद अहेर यांची निवड करण्यात आली आहे.
आयएमए सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट लेखक प्रा. प्रकाश भागवत हे होते. यावेळी नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली. त्यात उपाध्यक्षपदी डॉ. सुनंदा मोरे, खजिनदारपदी डॉ. अभय शुक्ल, सहसचिवपदी डॉ. पंकज देवरे, सुसंवाद संपादक म्हणून डॉ. प्रतिभा जोशी, तर सहसंपादक म्हणून डॉ. प्रदीप गवळी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. विनय मोगल, डॉ. संजय दाभाडकर, डॉ. मृत्युंजय जाधव, डॉ. संजय रकिबे, डॉ. अविनाश पवार, डॉ. विजय मुंदडा, डॉ. शीतल सुरजुसे, डॉ. रूपेश मर्दा, डॉ. मंजूषा दराडे, डॉ. विजय रूमाले, डॉ. तेजस्विनी सोलोमन, डॉ. मंजूषा व्यवहारे, डॉ. विजय निकुंभ
(निमंत्रित सदस्य) यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष डॉ. स्मिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. नवीन वर्षात विविध रोगनिदान शिबिरे, गरजूंना मदत, शालेय मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्याचे त्यांनी जाहीर केले.