शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुथूट फायनान्सच्या मुख्य सुत्रधाराच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:55 IST

घटना घडल्यापासून आरोपी अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. प्रत्येक वेळी मोबाईलचे सीम कार्ड बदलत असल्यामुळे त्याचे लोकेशन काढणे पोलिसांना अवघड झाले होते.

ठळक मुद्देसॉफ्टवेअर अभियंत्यांची गोळ्या घालून हत्या केली होतीत्याच्या ताब्यातून सहा सीम कार्ड व कार जप्त करण्यात आली आहे

नरेंद्र दंडगव्हाळनाशिक : सुमारे दोन महिन्यांपूर्वी नाशकातील उंटवाडी येथील मुथूट फायन्सासच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने घुसून प्रतिकार करणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची गोळ्या घालून हत्या करणा-या मुख्य सुत्रधाराच्या पोलिसांनी बिहारमधून मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्यात यापुर्वीच पोलिसांनी दोघांना अटक केल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.

आकाशसिंग विजय बहाद्दरसिंग राजपुत असे या मुख्य सुत्रधाराचे नाव असून, त्याला बिहार येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटना घडल्यापासून आरोपी अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. प्रत्येक वेळी मोबाईलचे सीम कार्ड बदलत असल्यामुळे त्याचे लोकेशन काढणे पोलिसांना अवघड झाले होते. दोन दिवसांपुर्वीच तो त्याची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक बी.आर. ३१ एस. ५४८८) घेण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी बिहार मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून सहा सीम कार्ड व कार जप्त करण्यात आली आहे. संशयित आकाशसिंग यानेच मुथूट फायनान्सच्या कार्यालयात अभियंता सॅम्युअल याच्यावर गोळी झाडली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांचेसह अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांचे पथक ९ जुलै रोजी बिहारला गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक