हसतमुखाने प्रचार, इतर कामांचा आढावा

By Admin | Updated: February 17, 2017 23:32 IST2017-02-17T23:32:11+5:302017-02-17T23:32:40+5:30

प्रचारसाहित्यासाठी धावाधाव

Smile publicity, review of other works | हसतमुखाने प्रचार, इतर कामांचा आढावा

हसतमुखाने प्रचार, इतर कामांचा आढावा

नाशिक : घराच्या दिवाणखान्यातील कार्यकर्त्यांची गर्दी, सकाळपासून सुरू झालेले दूरध्वनी, घराबाहेर पडल्यानंतर जागोजागी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार, जेवणाचा ब्रेक, अल्पशा विश्र्रांतीनंतर पुन्हा तोच सिलसिला रात्री उशिरापर्यंत... हा दिनक्रम आहे माकपाच्या शहर सचिव अ‍ॅड. वसुधा कराड यांचा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या ‘पक्षप्रमुखांसमवेत एक दिवस’ या विशेष उपक्रमांतर्गत रविवारी अ‍ॅड. वसुधा कराड यांच्यासोबत घालविलेल्या दिवसाचा हा वृत्तांत.  अ‍ॅड. वसुधा कराड यांचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो. कार्यकर्त्यांना फोन करून संवाद साधतात. कालच्या दिवसभरात प्रचार कसा झाला, संपर्क किती झाला, काय कामे झाली, कुठे अडचणी आल्या याचा आढावा घेतात. समाजातील विविध घटकांच्या नागरिकांशी फोन करून प्रत्यक्ष संवाद साधतात. आजच्या दिवसात कोणत्या भागात प्रचार करायचा आहे, सभा कुठे घ्यायच्या आहेत याविषयीचे नियोजन करतात. नास्ता आटोपून त्या सातपूरहून खुटवडनगरच्या प्रचार कार्यालयात पोहोचतात.  कार्यकर्ते स्त्री-पुरुष, उमेदवारही जमलेले असतात. घोषणा देत, प्रचार गाडीवरून प्रचाराची गाणी दणदणीत आवाजात सुरू असतातच.
प्रभागातील सर्व उपनगरे, कॉलन्या, गल्ल्या आणि प्रत्येक घर आणि घर पिंजून काढून कार्यकर्ते व उमेदवारांसह त्या मतदारांना आवाहन करतात. प्रचारानेच दिवसाची सुरुवात आणि प्रचारानेच दिवस संपणे हाच त्यांचा दैनंदिन नित्यक्रम.
१३ उमेदवारांसाठी पायपीट
शहर सचिव या नात्याने स्वत:च्या प्रभागासह संपूर्ण शहराची जबाबदारी असल्याने उर्वरित १३ उमेदवारांच्या प्रचाराचे काम कुठपर्यंत आले आहे, काय अडचणी आहेत या साऱ्यांचा अ‍ॅड. वसुधा कराड आढावा  घेतात.
खुटवडनगर, साळुंकेनगर, चाणक्यनगर, पाटीलनगर, डिजीपीनगर आदि भागांत सकाळी, तर जाधव संकुल भागात सायंकाळी कार्यकर्त्यांसह पायी प्रचार केला. छोटेखानी सभाही झाल्या.
प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे हळदीकुंकू लावून, दिवा ओवाळून औक्षण केले. कुणी हातावर साखर दिली, तर कुणी नारळ. मतदारांचा चहा-पाण्याचा आग्रह मात्र वेळेचे कारण देत मोडला जातो.
प्रचार संपल्यानंतर प्रचारकार्यालयात पोहोचताच कार्यकर्त्यांचा त्यांना गराडा पडतो. उमेदवारांची नावे न सापडणे, स्लिपांच्या कामांचे नियोजन, इतर प्रशासकीय कामांचे नियोजन याची चर्चा होऊन भराभर निर्णय घेतले जातात.
सकाळ सत्रातील प्रचार रॅली आटोपून जेवणासाठी घरी गेल्यानंतरही निवडणूक व प्रचार या गोष्टींचीच चर्चा आणि आगामी काळातील मोठ्या सभा, वक्ते यांचे नियोजन, राहिलेल्या भागांमध्ये प्रचारदौरे आदिंवरच त्यांचा भर होता.
प्रचारादरम्यान प्रभागात फिरताना लोक व्यक्तिश: ओळखत असल्याने त्यांचे सर्वत्र हसतमुखाने व चांगल्या प्रतिसादाने स्वागत झाले. अनेक कार्यकर्ते तर स्वत:च्या घरापासून सहकुटुंब प्रचार रॅलीत सहभागी
झाले. प्रचारासाठी शहरात फिरताना स्वपक्षाच्या प्रचारयंत्रणेतील गाण्यांबरोबरच त्या इतर पक्षांनी तयार केलेल्या जिंगल्स आणि प्रचाराची गाणी, त्यातील शब्द यांचेही दिलखुलासपणे विश्लेषण करतात.

Web Title: Smile publicity, review of other works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.