आदिवासी बांधवांच्या चेह-यावर फुलले हसू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:50 IST2018-11-03T17:50:20+5:302018-11-03T17:50:37+5:30
त्र्यंबकेश्वर : भारतातील सर्वसामान्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेले शेगाव येथील श्रीगजानन महाराज संस्थानच्यावतीने आदिवासी बांधवांना दिपावलीनिमित्त कपड्यांचे वाटप करण्यात आले.

आदिवासी बांधवांच्या चेह-यावर फुलले हसू !
त्र्यंबकेश्वर : भारतातील सर्वसामान्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेले शेगाव येथील श्रीगजानन महाराज संस्थानच्यावतीने आदिवासी बांधवांना दिपावलीनिमित्त कपड्यांचे वाटप करण्यात आले.
कावनई परिसरातील आदिवासी बांधवांच्या कुटुंबातील, सर्व सदस्यांना दिवाळीसाठी चार ते पाच दिवस अगोदरच नवीन कपड्यांचे वाटप दरवषी संस्थानतर्फे करण्यात येते. कपडे वाटपात आदिवासी पुरु ष महिला लहान मोठी मुले मुली या प्रत्येकाच्या वयोगटानुसार एकुण ५० हजाराच्यावर आदिवासी बांधवांना धोतर, शर्ट, पायजमा, साडी, लुगडे, पंजाबी, फ्रॉक आदी संस्थानद्वारे सर्व कुटुंबांचे अगोदर सर्वेक्षण करु न मगच सर्व कपडे दिवाळी अगोदरच मिष्ठान्नासह कापड प्रसाद वितरण करण्यात आले. महंत स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते कपडे वितरणाचा शुभारंभ करण्यात येऊन सर्व कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वामी केशवानंद, श्री पंचायती आनंद अखाडा उपस्थित होते.
दरम्यान श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्यावतीने ४२ सेवा योजना कार्यरत आहेत. भाविकांनी दिलेल्या दानातुनच आदिवासी बांधवांच्या चेह-यावर आनंद फुलावा त्यांची दिवाळी सहकुटुंब आनंदात साजरी व्हावी म्हणून श्रीसंस्थेद्वारा गत ३६ वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील वसाली अंबाबरवा चुनखडी शेंबा मांगेरी (मध्यप्रदेश सिमावर्ती भाग) भिंगार चाळीस टपरी गहुमार या आदिवासी भागात देखील हा उपक्र म चालु आहे.