साकोरा (मिग) ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:42 IST2021-01-28T21:34:39+5:302021-01-29T00:42:53+5:30

कोकणगाव : निफाड तालुक्यातील साकोरे (मिग) ग्रामपंचायतीला तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले आहे.

Smartgram Award to Sakora (Mig) Gram Panchayat | साकोरा (मिग) ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार

स्मार्टग्राम पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना सरपंच सुनीता हिरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब आहिरे आदी.

ठळक मुद्देतालुकास्तरीय स्पर्धेतून निर्धारित निकषांमधून सर्वाधिक गुण प्राप्त

कोकणगाव : निफाड तालुक्यातील साकोरे (मिग) ग्रामपंचायतीला तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातील सन २०१८/१९ या वर्षात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत स्मार्टग्राम योजनेंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेतून निर्धारित निकषांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केले. त्यामुळे साकोरे (मिग) ग्रामपंचायतीस तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने पालकमंत्री छगन भुजबळ, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत सरपंच सुनीता हिरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब आहिरे यांना प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे रूपडे पालटण्यासाठी मदत होणार आहे.
 

Web Title: Smartgram Award to Sakora (Mig) Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.