शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट रोड’ लांबणीवर पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:55 IST

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी कंपनीला काही भागात जागा संपादित करावी लागणार आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला असला तरी, या स्मार्ट रोडसाठी दुतर्फा प्रत्येकी ७.५ मीटरचा रस्ता करण्यासाठी कंपनीला काही भागात जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी कलम २१० अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना कंपनीने महापालिकेच्या नगररचना विभागाला केल्या आहेत. परंतु, केवळ एफएसआयच्या मोबदल्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा देण्याबाबत मालकांकडून प्रतिसाद मिळेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे, स्मार्ट रोडचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाक्यावरील मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर रोडलगत फुटपाथ, सायकल ट्रॅक यांसह अन्य सुविधा असणार आहेत. स्मार्ट रोडसाठी कंपनीने निविदाप्रक्रिया राबविली होती. परंतु, पहिल्यांदा निविदाप्रक्रियेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे दुसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविली असता त्यात तीन जणांनी निविदा भरल्या. आता निविदाप्रक्रिया अंतिम करून एका एजन्सीला कार्यादेश देण्याची तयारी सुरू आहे. परंतु, कंपनीने बनविलेल्या आराखड्यानुसार, दुतर्फा ७.५ मीटर जागा रस्त्यासाठी सोडून उर्वरित जागेत फुटपाथ, सायकल ट्रॅकची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, ७.५ मीटर जागा सोडताना मेहेर ते अशोकस्तंभ आणि सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल या दरम्यान दुतर्फा जागा संपादित करण्याचे आव्हान कंपनीपुढे आहे.  जागामालकांकडून काही प्रमाणात जागा घेताना त्यांना महापालिकेकडून टीडीआर, एफएसआयसारखे लाभ देता येतील काय, यादृष्टीने कंपनीने चाचपणी केली आहे. त्यानुसार, कंपनीने महापालिकेच्या नगररचना विभागाला कलम २१० अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा सामासिक अंतरात येणाºया काही जागा संपादनासाठी कळविले आहे. परंतु, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा देण्याबाबत जागामालक कितपत अनुकूलता दर्शवतील याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे, प्रस्तावित स्मार्ट रोडचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  प्रकल्प सल्लागार संस्थेबद्दल तक्रारस्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणाºया प्रकल्पांचे सर्वेक्षणासह आराखडा तयार करण्याचे काम कंपनीने केपीएमजी या संस्थेला दिले आहे. स्मार्ट रोडचेही काम सदर संस्थेकडे आहे. परंतु, सदर संस्थेला स्मार्ट रोडचे सर्वेक्षण करण्यासंबंधी वारंवार कळवूनही काम होत नसल्याची तक्रार कंपनीच्या नगररचनाकारांनी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे समजते. स्मार्ट रोडचे काम सहा महिन्यांत पूर्ण करावयाचे असल्याने कलम २१० ची कार्यवाही वेगात होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी स्मार्ट रोडच्या प्लेन टेबलचा सर्व्हे करणे महत्त्वाचे आहे. परंतु, केपीएमजीच्या कासवगती कामकाजामुळे प्रकल्पाचे काम रखडल्याचेही कंपनीने आयुक्तांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका