शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नाशिक महापालिकेत स्मार्ट पार्किंगचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 19:01 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन : ३३ ठिकाणी पार्किंगचे नियोजन

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजनआॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा आहे

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील पार्किंग सुरू करण्यापूर्वी त्याची चाचणी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (दि.६) घेण्यात आली. यावेळी बुम अ‍ॅरिअरसह पार्किंगचे दर, वाहनांसाठी मोकळी जागा याबाबतची माहिती डिजिटल डिस्प्लेद्वारे देण्यात आली तसेच मोबाइल अ‍ॅपचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.महापालिका क्षेत्रात वाहनतळाचा विषय गंभीर असून, या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात ३३ ठिकाणी पार्किंग होणार आहे. आॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा आहे. याठिकाणी वाहनतळ डिजिटल केले जाणार असून, त्यांची जोडणी एका अ‍ॅपद्वारे मोबाइलशी केली जाणार आहे. त्याद्वारे वाहनधारक ज्या रस्त्यावर वाहने लावू इच्छितात, त्यांना जवळील महापालिकेचे वाहनतळ कोणते, तेथे पार्किंगचे दर काय आहेत, वाहनासाठी जागा शिल्लक आहे किंवा नाही याचीही माहिती मिळणार आहे. बारकोड पद्धतीचे तिकीट, अवघ्या तीस सेकंदात पार्किंगमधून बाहेर पडण्याची सोय याची चाचणी यावेळी करण्यात आली. त्यासाठी राजीव गांधी भवनातील पार्किंग, रामायण बंगल्यालगतचे वाहनतळ आदी ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.आयुक्तांकडून पाहणीस्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंग व्यवस्थेची चाचणी घेण्यात आली त्याप्रसंगी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याची पाहणी केली. यावेळी, आयुक्तांनी संबंधित एजन्सीसह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. याप्रसंगी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच उपआयुक्त महेश बच्छाव आदींसह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग