शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:41 IST

शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

नाशिक : शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. असे अनधिकृत जाहिरातींची पत्रके चिटकवून शहर विद्रुप करणाऱ्यांची वक्रदृष्टी स्मार्ट सिटीवरही पडली असून, स्मार्ट सिटीच्या कामांनाही अशी पत्रके चिटकली जाऊ लागल्याने हे प्रकल्प उभे राहण्यापूर्वीच त्यांना अनधिकृत जाहिरातीमुळे होणाºया विद्रुपीकरणाचे ग्रहण लागले आहे.भित्तिपत्रक चिटकून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिकेने लोकमतच्या वृत्ताची दखल घेत कारवाई करीत गुन्हे दाखल केले. परंतु. त्यानंतरही अशा जाहिराती चिटकविणाºयांना कठोर शासन होत नसल्याने शहरात भित्तिपत्रकांच्या माध्यमातून अनधिकृत जाहिरातबाजी करणाºया नतद्रष्टांना बळ मिळत आहे. त्यातूनच सीबीएस ते अशोकस्तंभ भागात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या स्मार्टरोडवरील बसस्थानकालाही अशाप्रकारे पत्रके चिटकवून विद्रुप करण्यात येत  आहे.विशेष म्हणजे, महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षक भिंतीवर विविध जाहिरातींची पत्रके चिटकविण्याचे प्रकार सर्रास सुरू असताना आता या विकृतांची नजर स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर पडली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीलाही आता अनधिकृत जाहिरातींचे ग्रहण लागले आहे.मानसिकता ‘स्मार्ट’ होणे आवश्यकएकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया नाशिक महानगरात ठिकठिकाणी जाहिराती, फलक भित्तिपत्रक ांची विद्रुपीकरण सुरू असताना दुसरीकडे जाहिरातींच्या माध्यमातून प्राप्त होणाºया महसुलात घट होऊन महापालिके च्या तिजोरीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासह नाशिककरांनीही सजग होण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीसोबत नागरिकांनीही स्मार्ट होत अशा विकृतींना पायबंद घालण्यासाठी भित्तिपत्रक चिटकविणाºयांविरोधात भूमिका घेण्याची गरज विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी