‘एचपीटी’चा कट्टा होतोय ‘स्मार्ट’

By Admin | Updated: December 5, 2015 22:51 IST2015-12-05T22:50:49+5:302015-12-05T22:51:41+5:30

सुसंवादाचा मार्ग : विद्यार्थी-शिक्षकांमध्ये होणार ‘मंथन’

'Smart' becoming the 'HPT' brand | ‘एचपीटी’चा कट्टा होतोय ‘स्मार्ट’

‘एचपीटी’चा कट्टा होतोय ‘स्मार्ट’

नाशिक : कॉलेजमधील मुला-मुलींची धम्माल, एकापेक्षा एक सरस विनोदां मध्न उडणारे हास्याचे फवारे, मित्र-मैत्रिणींपैकी एखाद्याला ‘टार्गेट’ करून त्याची उडविली जाणारी टर्र आणि एकमेकांच्या हातावर टाळ्या देत दिला जाणारा प्रतिसाद. व्हॉट्स अ‍ॅपवर मग्न होऊन सुरू असलेले ‘चॅटिंग’ असे चित्र महाविद्यालयांच्या कट्ट्यावर हमखास दिसते. अनेकदा शिक्षकदेखील कट्ट्यांकडे कानाडोळा करणे पसंत करतात; मात्र ‘एचपीटी’चा ‘कट्टा’ विद्यार्थी-शिक्षकांच्या सुसंवादाच्या मैफलीने ‘स्मार्ट’ होणार आहे.
एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या प्रांगणातील ग्रंथालयासमोरील वटवृक्षाच्या छत्रछायेखाली असलेल्या कट्ट्यावर ‘स्मार्ट कट्टा’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांना याच कट्ट्यावर आता वैचारिक व्यासपीठ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कट्ट्यावर आता केवळ तरुण-तरुणीच बसून गप्पा मारताना दिसून येणार नाही तर विद्यार्थी-शिक्षक यांच्यामधील सुसंवादाचा कार्यक्रमही कट्ट्यावर रंगणार आहे. या संवादामधून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून, त्यासाठी कोणत्याही विषयाचे कुठलेही बंधन राहणार नाही. समाजकारण, राजकारण, आरोग्य, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर कट्ट्यावर मंथन घडणार आहे. येत्या गुरुवारपासून (दि.१०) कट्ट्यावर विद्यार्थी व शिक्षकांमध्ये स्मार्ट संवाद बघावयास मिळणार आहे. पहिला विषय कट्ट्यावर
‘पेटंट-कॉपिराईट’ हाताळला जाणार आहे.

Web Title: 'Smart' becoming the 'HPT' brand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.