शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नाशिकची ओळख असलेल्या गोदावरीचा नदीकाठ होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 4:05 PM

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत ३५० कोटींच्या गोदा प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

ठळक मुद्दे‘गोदा प्रकल्प’ अंतर्गत दोन टप्प्यांत १८ कामे साकारली जाणारसुरुवातीला रेट्रोफिटींग अंतर्गत कामे हाती घेतली जाणार

नाशिक - शहराची ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर सौंदर्याचा साज चढविणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोदा प्रकल्पाच्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या मास्टर प्लॅनला गुरुवारी (दि.२) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘गोदा प्रकल्प’ अंतर्गत दोन टप्प्यांत १८ कामे साकारली जाणार असून नववर्षात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांनी दिली.स्मार्ट सिटी अंतर्गत कंपनीची पाचवी बैठक महापालिकेच्या मुख्यालयात सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मूळ ५१५ कोटी रुपयांचा असलेल्या गोदा प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर करण्यात आला. त्यातील १८ कामांना संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने, अ‍ॅम्पी थिएटर, सायकल ट्रॅक, प्राचीन कुंड पुनर्जिवित करणे, पुलांची निर्मिती आदी कामांचा समावेश आहे. पुनर्विकास अर्थात रेट्रोफिटींग आणि ग्रीनफिल्ड अर्थात हरितक्षेत्र या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये सदर कामे केली जाणार आहेत. सुरुवातीला रेट्रोफिटींग अंतर्गत कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याच्या सूचना कुंटे यांनी दिल्या. बैठकीत, सोलर रुफटॉफ प्रकल्पाच्या डीपीआरलाही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत शहरातील सहा ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यात महापालिकेचे पंचवटी विभागीय कार्यालय, मनपाचे इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, महात्मा फुले कलादालन, कालिदास कलामंदिर आणि पंचवटीतील मनपाची ज्ञानेश्वर अभ्यासिका यांचा समावेश आहे. सुमारे ३७ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर होणार असून या प्रकल्पासाठी १ कोटी ६३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. दरम्यान स्मार्ट रोड साकारण्यात येणार असून त्याच्याही सविस्तर प्राकलनाला मंजुरी देण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार, सर्वात कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. या दाहिनीसाठी २ कोटी ३२ लाख ९८ हजार रुपये खर्च येणार आहे. याशिवाय, कंपनीचे स्वत:चे पोर्टल व अ‍ॅप विकसित करण्यात येणार असून त्यालाही मान्यता देण्यात आली. बैठकीला, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, भारत सरकारच्या उपसचिव रेणू सतिजा, संचालक महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते.४१ ठिकाणी स्मार्ट पार्कींगशहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ४१ ठिकाणी स्मार्ट पार्कींग मॅनेजमेंट सिस्टम राबविण्याच्या सविस्तर प्राकलनाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ३४ ठिकाणी आॅन स्ट्रीट तर ७ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींग विकसित करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पालाही तातडीने चालना देण्याच्या सूचना सीताराम कुंटे यांनी दिल्या. याचबरोबर स्मार्ट सिटीचे कार्यालय महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. ३५० स्क्वेअर मीटरमध्ये सदर कार्यालय थाटण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :riverनदीNashikनाशिक