झोपडपट्टीवासीयांचा महापालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:44 IST2018-09-13T00:43:26+5:302018-09-13T00:44:39+5:30
नाशिक : झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा पुरविण्यात येऊन त्या अधिकृत घोषित कराव्यात तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे या रहिवाशांसाठी ते आहेत त्याच ठिकाणी घरकुल योजना राबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे(एकीकृत) बुधवारी (दि.१२) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेले कार्यकर्ते व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

शहीद भगतसिंग कॉलनी (सिडको) येथील योजनेत बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, त्याची चौकशी व्हावी, घटस्फोटित व विधवा महिलांनादेखील घरकुल योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात किशोर घाटे तसेच बाळासाहेब वळवी, दिलीप सापटे, मदन मोरे, गौतम गणकवार, गोविंद साळवे, बबन मोरे, राज खरात, गणपत भुजड, जॉनी वाघ, अनिल गुंजाळ आदी सहभागी झाले होते.घरकुलांमध्ये समावेशाची मागणीशहरातील उंटवाडी रोडवरील क्र ांतीनगर, बॉईज टाउनसमोरील सिद्धार्थनगर येथील झोपडपट्टीवासीयांना त्याच जागेवर आवास योजनेअंतर्गत घरे बांधून मिळावी. तसेच रमाबाई आंबेडकरनगर (अंबड), गौतमनगर, शांतीनगर, भीमवाडी (गंजमाळ), संत कबीरनगर, शहीद भगतसिंग नगर (सिडको) येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये उर्वरित नागरिकांना समाविष्ट करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.