अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप
By Admin | Updated: March 1, 2016 23:44 IST2016-03-01T23:42:46+5:302016-03-01T23:44:29+5:30
अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप

अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप
कळवण : मानूर येथे तरुणी ठारजायखेडा : सात जनावरांचा मृत्यूसटाणा : बागलाण तालुक्याला यंदाही अवकाळी आणि गारपीटचे ग्रहण लागले आहे.मंगळवारी दुपारी अचानक प्रचंड वादळ .गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पावसाने मोसम ,करंजाडी खोऱ्याला अक्षरश: झोडपून काढले.गारपीटने सुमारे साडे पाच हजार हेक्टर वरील उन्हाळ कांदा भुई सपाट झाला. डाळिंबा बागांची फुल आणि फळ गळ झाली. काढणीवर आलेले गहू, हरभरा पिक नेस्तनाभूत झाले. वादळी पावसाने करंजाड शिवारात दोन घरांची पत्रे उडून शेतकरी दांम्पत्य गंभीर जखमी झाले. कालच्या या आस्मानी अरिष्ट कोसळल्याने पिकांची कोट्यावधी रु पयांची हानी झाली आहे.त्यामुळे सलगच्या आस्मानी अरिष्टमुळे शेतकरी आता पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे.
मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक पश्चिमेकडून धूळ वादळ सुटले. हे वादळ भयंकर होते जवळचे काहीही दिसत नव्हते. त्यातच वादळामुळे भगवान वृषभदेव मूर्तीच्या पंचकल्यानक सोहळयासाठी लावलेल्या चार स्वागत कमानी कोसळल्याने विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान वादळानंतर मोसम खोऱ्यातील अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, लाडूद, दसवेल, पिंपळकोठे, तांदुळवाडी ,दरेगाव, भडाणे, मांगीतुंगी, जायखेडा, आंनदपूर या गावांवर दोन ते तीन मिनिटे गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पाऊस कोसळला.