अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप

By Admin | Updated: July 10, 2015 00:21 IST2015-07-10T00:20:52+5:302015-07-10T00:21:07+5:30

वडाळारोडवरील घटना : दैव बलवत्तर असल्यानेच वाचली

Sleepy chimurdi from car on the car | अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप

अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप

नाशिक : वेळ दुपारची. आईमागे तीन वर्षांची चिमुरडी धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी मोटारीची त्या चिमुरडीला धडक बसते अन् ती जमिनीवर कोसळते. सदर बाब मोटारचालकाच्या लक्षात येत नाही व तो मोटार पुढे दामटवितो. चिमुरडीच्या अंगावरून मोटारीचे पुढचे व मागचे चाक गेल्याचे बघून पोटचा गोळा गाडीखाली चिरडला गेल्याचे बघून आई एकच टाहो फोडते अन् धावत मोटारीजवळ येऊन मोठ्या हिमतीने मोटारीखालून चिमुरडीला उचलून कवटाळते. ही अंगावर शहारे आणणारी व काळजाचा ठोका चुकविणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या चिमुरडीचे नाव जोया. एक हजार ८० किलो वजनाची मारुती इरटिगा मोटार या चिमुरडीच्या अंगावरून जाऊनही तिचे प्राण वाचले. अपघातात जखमी झालेल्या चिमुरडीवर पंधरा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर जीवन-मृत्यूच्या संघर्षामध्ये ‘जोया’चा विजय झाला अन् तिला जीवदान मिळाले.
वडाळारोडवरील रहनुमा उर्दू शाळेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या गुरुवारी (दि.१८ जून) दुपारी मारुती मोटारीने (एमएच १५ ईपी २५३०) तीनवर्षीय बालिका जोया मुझफ्फर खान हिला धडक दिल्याची घटना घडली होती.

Web Title: Sleepy chimurdi from car on the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.