वाळूचा डंपर कोसळून एक ठार
By Admin | Updated: May 3, 2016 00:33 IST2016-05-02T23:18:07+5:302016-05-03T00:33:12+5:30
उमराळे बुद्रूक : तीन जण जखमी

वाळूचा डंपर कोसळून एक ठार
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाजवळ वाळू भरलेला डंपर उलटून वडांगळी येथील युवक ठार झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
उमराळेमार्गे वाघाडला पहाटे ४ च्या सुमारास वाळू घेऊन येत असताना ट्रक वाघाड धरणाचे बाजूला जाणाऱ्या घाटाचे रस्त्याने उतरत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटून पुलाच्या खाली कोसळला. त्यात बसलेला महेश सोमनाथ खुळे (२४) रा.वडांगळी, ता.सिन्नर हा गाडीच्या केबिनमध्ये दबून जागीच ठार झाला, तर चालक व अन्य तीन जणांनी गाडीतून उडी मारल्याने ते बचावले. मात्र तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी जेसीबीने वाळू बाजूला करत खुळे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. खुळे यास सैन्य दलात जायचे होते. त्यासाठी त्याने प्रशिक्षण वर्गही लावला होता मात्र तो मित्रांसोबत वाळूच्या गाडीवर आला अन् अपघातात मरण पावला. दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बोरसे, बोकड, कदम, खांडवी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)