साधुग्राममध्ये वृक्षाची कत्तल
By Admin | Updated: August 18, 2015 00:27 IST2015-08-18T00:23:45+5:302015-08-18T00:27:05+5:30
न्यायालयाचा अवमान : तपोभूमीतच वृक्षावर घाव; आल्हाददायक वातावरणाला तडा

साधुग्राममध्ये वृक्षाची कत्तल
नाशिक : विविध रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळा ठरणारी शेकडो झाडे तोडण्याबाबत महापालिकेने न्यायालयात धाव घेतली आहे; मात्र अद्याप न्यायालयाने वृक्षतोडीसंदर्भात पालिकेलाही आदेश दिलेला नाही. परंतु साधुग्रामच्या ‘सेक्टर-१ ए’मधील एका बाभळीच्या झाडाची अज्ञात व्यक्तीकडून कत्तल केल्याची घटना उघडकीस आल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
‘तपोवन’ नावातच अर्थ दडलेला आहे तो म्हणजे तप करण्याचे वन अर्थात दंडकारण्य. म्हणूनच येथे कुंभमेळ्याच्या औचित्यावर ‘साधुग्राम’ वसविण्यात आले. परंतु साधुग्रामच्या ‘सेक्टर-१ ए’च्या लेन क्रमांक ६ मध्ये मजुरांसाठी असणाऱ्या मोकळ्या भूखंडावरील बाभळीचा वृक्ष जमीनदोस्त करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.