डिन्फो आॅर्गनायझेशनच्या वतीने कौशल्य मेळावा

By Admin | Updated: March 25, 2016 23:42 IST2016-03-25T23:13:26+5:302016-03-25T23:42:29+5:30

डिन्फो आॅर्गनायझेशनच्या वतीने कौशल्य मेळावा

Skill Management on behalf of the DINFO Organization | डिन्फो आॅर्गनायझेशनच्या वतीने कौशल्य मेळावा

डिन्फो आॅर्गनायझेशनच्या वतीने कौशल्य मेळावा

सिडको : भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत डिन्फो आॅर्गनायझेशनच्या वतीने येत्या रविवारी (दि. २७) कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डिन्फो आॅर्गनायझेशनचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे रविवारी (दि.२७) दुपारी चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२२ पर्यंत भारत देश जगात विकसनशील राष्ट्राच्या तुलनेत एक क्रमांकावर येण्यासाठी ५० कोटी युवकांना विकसित करण्याची सरकारची महत्त्वाकांशी योजना असून यापुढील काळात स्कील प्रमाणपत्र असल्याशिवाय नोकरी व्यवसायात पर्याय नाही. त्यामुळे इयत्ता दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही चिटणीस यांनी सांगितले. तसेच उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती डिन्फोचे पुष्येन चिटणीस यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Skill Management on behalf of the DINFO Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.