शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

लाचखोरांवरील कारवाईत  नाशिक राज्यात सहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:16 IST

राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़

नाशिक : राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़ यामध्ये नाशिकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचा विचार करता राज्यात ते सहाव्या क्रमांकावर आहे़ २०१७ मध्ये याच कालावधीत ७९ सापळे लावण्यात आले होते, तर यावर्षी केवळ ४८ सापळे लावण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत ३१ ने घट झाल्याचे दिसून येते़ त्यामुळे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई थंडावली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परीक्षेत्रांमधील गत सात महिन्यांमध्ये ५११ यशस्वी सापळे रचण्यात आले असून, त्यामध्ये अपसंपदेचे १४, तर अन्य भ्रष्टाचाराचे १६ असे एकूण ५४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण त्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसेच खासगी लोकांचा सहभाग वाढला आहे.  या प्रकरणांना आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यभरात कारवाई केली जाते़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या सापळ्यांच्या संख्येत सातने घट झाली आहे़लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राज्यभरात केलेल्या कारवाईत ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात केली आहे, तर अपसंपदा प्रकरणी एकूण ६ कोटी १ लाख ३५ हजार ४५ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. गत सात महिन्यांमध्ये ५११ यशस्वी सापळे रचून कारवाई करण्यात आली.६९६ आरोपींना अटकशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवक आणि खासगी व्यक्ती असे मिळून एकूण ६९६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ मध्ये न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांपैकी ३५ खटल्यांचे दोषारोप सिद्ध झाले आहेत़ यामध्ये ४३ आरोपींना शिक्षा झाली असून, त्यांना ८८ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNashikनाशिक