सिंधी पंचायतीच्या पंधरा जागेसाठी सोळा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:25+5:302021-01-08T04:43:25+5:30

सिंधी बांधवांनी एकत्र येत १९४८ मध्ये स्थापना केलेल्या पंचायतीची दर २ वर्षांनी निवडणूक होते. १५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा ...

Sixteen applications filed for fifteen seats of Sindhi Panchayat | सिंधी पंचायतीच्या पंधरा जागेसाठी सोळा अर्ज दाखल

सिंधी पंचायतीच्या पंधरा जागेसाठी सोळा अर्ज दाखल

सिंधी बांधवांनी एकत्र येत १९४८ मध्ये स्थापना केलेल्या पंचायतीची दर २ वर्षांनी निवडणूक होते. १५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा ६०० पेक्षा अधिक मतदार आहेत. पंधरा जागांसाठी सोळा उमेदवारी अर्ज दाखल असल्याने एकाने माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अन्यथा सिंधी बांधवांना निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राजू नागदेव यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना जगदिश हेमनानी व ईश्वर धामेजा हे साहाय्य निवडणूक अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. ११ ते १३ जानेवारी दरम्यान सकाळी ११ ते २ या वेळेत अर्ज माघार घेणे, निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल व त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकडे सिंधी बांधवांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sixteen applications filed for fifteen seats of Sindhi Panchayat