सहा अनधिकृत शेड जमीनदोस्त
By Admin | Updated: June 10, 2016 00:20 IST2016-06-09T23:01:17+5:302016-06-10T00:20:16+5:30
सहा अनधिकृत शेड जमीनदोस्त

सहा अनधिकृत शेड जमीनदोस्त
नाशिक : पंचवटी विभागात औरंगाबाद रोडवरील कुष्ठधाम येथे मनपाच्या जागेत अनधिकृतपणे उभारलेल्या सहा लोखंडी शेड जमीनदोस्त केल्या. सुरुवातीला अतिक्रमणधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पथकाने विरोधाला न जुमानता नियमानुसार कारवाई करत जेसीबी चालविला.
महापालिकेने गुरुवारी पंचवटी विभागातील अनधिकृत बांधकामाकडे आपला मोर्चा वळविला. औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळील स. नं. ३३५ (पै) मधील कुष्ठधाम येथील मनपाच्या मोकळ्या जागेत ८० बाय ४०, २५ बाय ७ अशा छोट्या- मोठ्या आकारांच्या सहा लोखंडी शेड अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या. सदर अतिक्रमण हे एका नर्सरीमालकाने केल्याचे सांगितले जाते. मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सदर लोखंडी शेड जमीनदोस्त केल्या. उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीचे विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकारी वसुधा कुरणावळ, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एम. डी. पगारे, अधीक्षक गायकवाड, नगररचनाचे अभियंता वसंत ढुमसे, मिळकतचे भानोसे यांच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)