२३ केंद्रांवर सहा हजार विद्यार्थ्यांनी दिली सीटीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:20+5:302021-02-05T05:44:20+5:30
कोरोनामुळे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (सीटीईटी) वेळापत्रकात सीबीएसईने बदल केला होता. ही परीक्षा यापूर्वी ५ जुलै २०२० रोजी होणार ...

२३ केंद्रांवर सहा हजार विद्यार्थ्यांनी दिली सीटीईटी
कोरोनामुळे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (सीटीईटी) वेळापत्रकात सीबीएसईने बदल केला होता. ही परीक्षा यापूर्वी ५ जुलै २०२० रोजी होणार होती. मात्र, कोविड -१९ महामारीमुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. अखेर मंगळवारी नाशिकसह देशातील १३५ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. यात नाशिकमधील २३ केंद्रांवर झालेल्या सीटीईटी परीक्षेत दोन पेपर घेण्यात आले. पहिला पेपर सकाळी ९.३० ते १२ व दुसरा पेपर दुपारी २ ते २.४० या वेळेत घेण्यात आले. यात दिव्यांग विद्यार्थ्यांना सुमारे ५० मिनिटांचा वाढीव कालावधी देण्यात आला होता. या परीक्षेला नाशिक जिल्हा व परिसरातून सुमारे ९ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांनी शहर व परिसिरातील सर्व केंद्रीय विद्यालये व सीबीएसई संलग्न विद्यालयांसह शहरातील काही प्रमुख तंत्रनिकेतन माविद्यालयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.