विवाहितेच्या छळप्रकरणी सहा संशयिताना अटक

By Admin | Updated: June 1, 2014 00:48 IST2014-05-31T21:43:03+5:302014-06-01T00:48:50+5:30

निफाड : नवविवाहितेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व संशयिताना निफाड पोलिसांनी अटक केली आहे.

Six suspects arrested in connection with marital rivalry | विवाहितेच्या छळप्रकरणी सहा संशयिताना अटक

विवाहितेच्या छळप्रकरणी सहा संशयिताना अटक

निफाड : नवविवाहितेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व संशयिताना निफाड पोलिसांनी अटक केली आहे.
निफाड येथील माहेर असलेली नवविवाहिता सौ. कावेरी अभिजित सोनवणे (२२) हिने सासरच्या मंडळींविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादित म्हटले आहे की, निफाडचे माहेर असलेली कावेरी हिचे लग्न मागील वर्षी (मातेरेवाडी, ता. दिंडोरी) येथील अभिजित देवराम सोनवणे यांच्याशी झाले. पहिल्या एक महिन्यात सासरच्यांनी चांगले वागवले; परंतु नंतर सासरच्या मंडळींनी कावेरीला त्रास देण्यास सुरुवात केली. तुझे डोळे तिरळे आहेत. तुला स्वयंपाक येत नाही, शिवाय तुझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी व जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून पती अभिजित याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. कावेरीच्या मामांनी व चुलत्याने सासरच्या मंडळींना भेटून तिला मारहाण करू नका ती चार महिन्यांची गरोदर आहे, असे सांगितल्यानंतरही सासरच्या मंडळींनी कावेरीला माहेरी काढून दिले. याप्रकरणी कावेरीचा पती अभिजित देवराम सोनवणे, देवराम सीताराम सोनवणे (सासरा), पुष्पा देवराम सोनवणे (सासू), योगेश देवराम सोनवणे (दीर), अनुजा योगेश सोनवणे (जाऊ), पांडुरंग नामदेव मोगल (मामे सासरे) या एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नांेदविण्यात आला असून, वरील सर्व सहा जणांना निफाड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट करीत आहेत. या सर्वांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या सर्वांची जामिनावर मुक्तता केली. (वार्ताहर)

Web Title: Six suspects arrested in connection with marital rivalry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.