जबरी लूट प्रकरणी सहाजणांना अटक
By Admin | Updated: July 24, 2016 00:57 IST2016-07-23T23:52:16+5:302016-07-24T00:57:48+5:30
जबरी लूट प्रकरणी सहाजणांना अटक

जबरी लूट प्रकरणी सहाजणांना अटक
पंचवटी : आडगाव परिसरात जबरी लूट तसेच पिस्तुलाचे मॅक्झिन व जिवंत काडतुसे विक्रीसाठी नेणाऱ्या सहा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून मोबाइल, रोख रक्कम, एटीएम कार्ड तसेच व दोन जिवंत काडतुसे, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वामी समर्थनगरमधील रहिवासी डॉ.अभिजीत सुरसे हे दोन महिन्यांपूर्वी बाहेरगावाहून नाशिकला येत होते़ त्यांच्यावर संशयित संभ्या उर्फ संभाजी विलास कवळे राहणार (एकतानगर, म्हसरूळ), वैभव उर्फ विक्की दत्तात्रय काळे (रा़रामवाडी) व बब्या उर्फ नीलेश अजय सुरजुसे (रा़ हनुमानवाडी) आदिंनी धारदार शस्त्राने वार करून त्यांच्या खिशातील २४ हजार रुपये, एटीएम असा ऐवज लुटून नेला.
तर त्यानंतर चारच दिवसांनी गणेशवाडी देवी मंदिर परिसरातील संशयित अविनाश रावसाहेब वाणी, वैभव काळे, संभाजी कवळे यांनी अमृतधाम परिसरातून पायी जाणाऱ्या श्रीकृष्ण जगताप यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली होती़