सहा दुकाने फोडली

By Admin | Updated: July 17, 2014 22:01 IST2014-07-17T01:15:03+5:302014-07-17T22:01:04+5:30

न्रशिक : रविवार पेठेमधील व्यापारी भागात सहा ते सात चोरट्यांच्या टोळक्याने सहा दुकानांचे शटर फोडून एकूण एक लाख नऊ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Six shops were closed | सहा दुकाने फोडली

सहा दुकाने फोडली

पनवेल : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण भरले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा हे धरण उशिरा भरले असले तरी लवकरच धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सुभाष भुजबळ यांनी दिली. परिणामी, पनवेलकरांची एप्रिल महिन्यापर्यंत चिंता मिटली आहे.
माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची २७७ हेक्टर जमीन असून, त्यातील १२५ क्षेत्रावर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच नगरपालिका आहे. या ठिकाणाहून जलवाहिनीद्वारे पनवेल शहराला पाणी पुरविण्याचा संकल्प केला होता. परंतु एमजेपी आणि ठेकेदारांच्या वादामुळे ही भुर्दंड पालिकेला बसला. पूर्वी जलाशयाची साठवणूक क्षमता जास्त होती मात्र २००५ साली झालेल्या महाप्रलयात माथेरानच्या डोंगराची माती वाहून येऊन ती देहरंग धरणात येऊन बसली. त्यामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली. त्याचा परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला एप्रिल महिन्यापर्यंत दररोज १२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वास्तविक पाहता पनवेलची गरज दुप्पट आहे. म्हणून पालिका एमजेपी, एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवले जाते.
उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही देहरंग धरण कोरडे पडले होते. त्यामुळे गेले पाच महिने पालिका पाण्यासाठी पूर्णत: एमजेपी आणि एमआयडीसीवर अवलंबून होती. पाण्यापोटी प्रशासनाला मोठी रक्कम या दोन्ही यंत्रणांना मोजावी लागत आहे. दरवर्षी जून महिन्यात हे धरण सांडवा पातळी गाठत असते. मात्र यंदा पाऊस लांबला. पूर्ण जून महिना आणि जुलैचे सुरुवातीचे काही दिवस कोरडे गेले. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. पावसाने दडी मारल्याने देहरंग धरण भरते की नाही अशी चिंता प्रशासनाला लागली होती. मात्र सुदैवाने गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरण भरले आहे. त्यामुळे गोडबोले गेटही उघडण्यात आले आहे. माथेरान आणि हजीमलंगच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने पाणी गढूळ झाले आहे. परिणामी दोन दिवसांत गाळ निवळल्यानंतर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Web Title: Six shops were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.