देवळ्यात सहा लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: October 13, 2014 00:45 IST2014-10-12T21:49:46+5:302014-10-13T00:45:53+5:30

देवळ्यात सहा लाखांची रोकड जप्त

Six lakh cash seized in the temple | देवळ्यात सहा लाखांची रोकड जप्त

देवळ्यात सहा लाखांची रोकड जप्त


नाशिक : देवळा शहरात शनिवारी सायंकाळी भरारी पथकाला एका बोलेरो गाडीत सुमारे पाच लाख ८० हजारांची रोकड सापडली. मात्र तपासाअंती सदर रक्कम शेवते (ता. पंढरपूर) येथील डाळींब व्यापारी अनिल पाटील यांची असल्याची खात्री पटल्याने सदर रक्कम परत करण्यात आली.
देवळा येथील मालेगाव रस्त्यावर पोलिसांच्या वतीने सूक्ष्म निरीक्षक पथक तैनात करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी सदर निरीक्षक पथकास बोलेरो गाडीत सुमारे पाच लाख ८० हजारांची रक्कम आढळून आली होती. याबाबत भरारी पथकाने कारवाई केली असता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील डाळींब व्यापारी अनिल मारुती पाटील यांची ती रक्कम होती. सदर रक्कम पाटील यांनी जायखेडा येथील बॅँकेतून काढून आणल्याची पावती भरारी पथकास दाखविली. त्यानंतर भरारी पथकाने सदर रक्कम परत केली. (प्रतिनिधी)

Web Title: Six lakh cash seized in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.